परिचय :

मा. विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे

आमदार, विधान परिषद महाराष्ट्र राज्य

कोपरगावच्या जनसेवेचा समृद्ध वारसा, सहकार क्षेत्रातील दूरदृष्टी आणि समाजकारणाची प्रेरणा लाभलेले मा. विवेक बिपिनदादा कोल्हे हे महाराष्ट्रातील नव्या पिढीचे अभ्यासू, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी नेतृत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (MLC) म्हणून राज्याच्या विकासात योगदान देत आहे. युवक, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.

विवेक बिपिनदादा कोल्हे यांचा सार्वजनिक जीवनाचा प्रवास हा पदासाठी नव्हे, तर समाजासाठी सुरू झाला.
नाशिक येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय मिळवून दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने कोपरगाव परिसरातील पहिला ग्रामीण BPO सुरू करून रोजगार निर्मितीची नवी दिशा दिली.

सहकार, शिक्षण, उद्योग, आरोग्य, कृषी आणि समाजसेवा या सर्व क्षेत्रांमध्ये सक्रिय योगदान देत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आज ते राज्याच्या विधान परिषदेतून जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे आवाज देत आहेत.

नवभारत आणि नवराष्ट्र माध्यम समूहांकडून ‘Young Promising Leader’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.

दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची दखल घेत, कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेने संजीवनी समूहाला ‘National Excellence in Entrepreneurship Award’ देऊन गौरविले.

कार्याची प्रमुख क्षेत्रे

जनसेवेसाठी समर्पित उपक्रम

आरोग्य सेवा

ग्रामीण व वंचित नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान आणि विविध वैद्यकीय उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न.

रोजगार निर्मिती

ग्रामीण युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी BPO, कौशल्य विकास, उद्योग आणि MIDC उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न.

शिक्षण

संजीवनीच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य.

आपत्ती व्यवस्थापन

भूकंप, पूर आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदत, अन्नधान्य, औषधे आणि आवश्यक साहित्य पुरवून समाजासोबत खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प.

कोविड-१९ सेवा

५०० खाटांचे कोविड हेल्थ केअर सेंटर, मोफत उपचार, औषधे आणि रुग्णवाहिका सेवेद्वारे संकटकाळात हजारो रुग्णांना दिलासा आणि जीवनदान.

सामाजिक उपक्रम

सर्वधर्मीय सामुदायिक विवाह, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समता, सामाजिक सलोखा आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचा प्रयत्न.

फॉलो करा

मा. विवेक कोल्हे यांच्यासोबत कनेक्ट व्हा!

Facebook

Instagram

Twitter

न्यूज & अपडेट्स

नवीन बातम्या आणि कार्यक्रम

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ हे ऐतिहासिक विधेयक विधानपरिषद सभागृहातही एकमताने मंजूर झाले. याबद्दल कृषिमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांची भेट …

विधानभवन, मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील भाजपा सदस्यांसाठी संसदीय कामकाजाविषयी मार्गदर्शनपर बैठक पार पडली. यावेळी सभागृहातील कामकाज अधिक …