Category Visits

महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व: महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६!

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, २०२६’ हे ऐतिहासिक विधेयक विधानपरिषद सभागृहातही एकमताने मंजूर झाले. याबद्दल कृषिमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे “आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” म्हणून घोषित केले आहे आणि याच…

लोकहिताच्या प्रभावी मांडणीसाठी अभ्यास, शिस्त आणि संसदीय परंपरेचे बळ!

विधानभवन, मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील भाजपा सदस्यांसाठी संसदीय कामकाजाविषयी मार्गदर्शनपर बैठक पार पडली. यावेळी सभागृहातील कामकाज अधिक परिणामकारकपणे हाताळणे, लोकहिताचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणे, संसदीय परंपरांचे पालन तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडण्याबाबत…

॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ॥

महाराष्ट्राची ओळख केवळ संतभूमी म्हणून नाही, तर संतांच्या विचारांनी, नामस्मरणाने आणि समतेच्या संदेशाने समृद्ध झालेल्या वारकरी संप्रदायामुळे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी समाजाला भक्ती, मानवता, बंधुभाव आणि सेवाभावाचा जो अमूल्य…

श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि. गणेशनगर रांजणगाव खुर्द ता. राहता येथे गळीत हंगाम २०२६–२७ च्या मिल रोलर पूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो.

श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि. गणेशनगर रांजणगाव खुर्द ता. राहता येथे गळीत हंगाम २०२६–२७ च्या मिल रोलर पूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो. मिल रोलर पूजन हा केवळ गळीत हंगामाचा शुभारंभ नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा, सहकाराच्या संस्कृतीचा आणि समृद्धीच्या नव्या पर्वाचा…

श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव!

श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव! भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून भारतीय संस्कृतीतील समता, सेवा, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा लोकोत्सव आहे. प्रभू स्वतः रथातून भक्तांच्या भेटीस येतात, ही भावना प्रत्येकाच्या मनात ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ करते.…

आठवणी, संस्कार आणि सन्मानाचा अविस्मरणीय क्षण..!

आठवणी, संस्कार आणि सन्मानाचा अविस्मरणीय क्षण..! नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्था येथे आयोजित संयुक्त पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचा योग आला. या प्रसंगी कर्मवीर कै. काकासाहेब वाघ, सहकार महर्षी कै. माधवराव बोरस्ते, कै. काकुशेठ उदेशी यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र…