लोकहिताच्या प्रभावी मांडणीसाठी अभ्यास, शिस्त आणि संसदीय परंपरेचे बळ!

विधानभवन, मुंबई येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषदेतील भाजपा सदस्यांसाठी संसदीय कामकाजाविषयी मार्गदर्शनपर बैठक पार पडली. यावेळी सभागृहातील कामकाज अधिक परिणामकारकपणे हाताळणे, लोकहिताचे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणे, संसदीय परंपरांचे पालन तसेच लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे पार पाडण्याबाबत सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रसंगी संसदीय कार्य मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री मा. आशिषजी शेलार आणि विधानपरिषदेतील भाजपा गटनेते आमदार प्रविणजी दरेकर, आमदार प्रसादजी लाड यांनीही आपल्या अनुभवातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *