पावसाळी अधिवेशनाच्या सांगता दिवसाचा संस्मरणीय क्षण…

लोकहिताच्या प्रश्नांवर विधायक चर्चा, महत्त्वपूर्ण निर्णय आणि महाराष्ट्राच्या विकासाचा दृढ संकल्प यांचे साक्षीदार ठरलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झालेल्या विधान परिषद सदस्यांचा गौरव करत त्यांच्या समवेत सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्र घेण्यात आले.

यावेळी निवृत्त सदस्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात आणि लोकहितासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परंपरे नुसार कृतज्ञता व्यक्त करत त्यांना निरोप देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *