श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव!

श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव!

भगवान श्री जगन्नाथांची रथयात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून भारतीय संस्कृतीतील समता, सेवा, भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारा लोकोत्सव आहे. प्रभू स्वतः रथातून भक्तांच्या भेटीस येतात, ही भावना प्रत्येकाच्या मनात ईश्वराशी असलेले नाते अधिक दृढ करते.

इस्कॉन कोपरगावच्या वतीने आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हरिनाम संकीर्तन, भजन-कीर्तन आणि “हरे कृष्ण, हरे राम”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या पावन सोहळ्यात सहभागी होऊन भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. प्रभूंच्या चरणी राज्याच्या, समाजाच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

प्रसंगी श्री. मच्छिंद्र केकान, श्री. विजय आढाव, श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. प्रशांत कडू, श्री. विनोद राक्षे, श्री. संतोष चवंडके, श्री. सरपंच संदीप श्रीपत देवकर, श्री. रोहित कनगरे, श्री. स्वराज सूर्यवंशी, श्री.कैलास मंजुळ, श्री.स्वप्निल मंजुळ, श्री. अर्जुन माकुणे, श्री. शैलेश नागरे, श्री. आयुब कच्छी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *