श्री गणेश सहकारी साखर कारखाना लि. गणेशनगर रांजणगाव खुर्द ता. राहता येथे गळीत हंगाम २०२६–२७ च्या मिल रोलर पूजन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित राहिलो.
मिल रोलर पूजन हा केवळ गळीत हंगामाचा शुभारंभ नसून शेतकऱ्यांच्या कष्टाचा, सहकाराच्या संस्कृतीचा आणि समृद्धीच्या नव्या पर्वाचा केलेला सन्मान आहे. येणारा गळीत हंगाम यशस्वी, विक्रमी आणि सर्वांसाठी लाभदायी ठरो, तसेच कारखान्याची प्रगती अधिक वेगाने होत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
या शुभप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री. सुधीरराव वसंतराव लहारे पाटील, व्हा. चेअरमन श्री. विजयराव भानुदास दंडवते पाटील, कार्यकारी संचालक श्री. जी. बी. शिंदे, तसेच संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बांधव आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








