॥ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल । श्री ज्ञानदेव तुकाराम ॥

महाराष्ट्राची ओळख केवळ संतभूमी म्हणून नाही, तर संतांच्या विचारांनी, नामस्मरणाने आणि समतेच्या संदेशाने समृद्ध झालेल्या वारकरी संप्रदायामुळे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी समाजाला भक्ती, मानवता, बंधुभाव आणि सेवाभावाचा जो अमूल्य वारसा दिला, तो आजही लाखो वारकऱ्यांच्या पायी वारीतून जिवंत आहे.

श्री क्षेत्र सडे ते श्री क्षेत्र पंढरपूर या पालखी पायी दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी होत आज जंगली महाराज आश्रम, विळद घाट येथे उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. यावेळी मनोभावे दर्शन घेत सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली.

वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नसून, ती आत्मशुद्धी, शिस्त, समता, सेवा, त्याग आणि सामाजिक ऐक्याची जीवनशाळा आहे. येथे जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद नसतो; सर्वजण “माऊली” म्हणून एकमेकांना सन्मान देत विठ्ठल नामाचा अखंड गजर करतात. हीच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ताकद आहे.

प्रसंगी श्री. भीमराव संत, श्री. प्रकाश टेके, श्री. मधुकर लक्ष्मण टेके, श्री. नारायणराव लोहकने, श्री. दादासाहेब गुंजाळ, श्री. भाऊसाहेब राऊजी टेके, श्री. मधुकर गायकवाड, श्री. भाऊसाहेब धोत्रे, श्री. विलास गाडेकर ,श्री. संतोष बारहाते, श्री. भाऊसाहेब शिरसाठ व असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *