NHEC विशेष सर्वसाधारण सभा!

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (NHEC) च्या विशेष सर्वसाधारण सभेला पुणे येथे उपस्थित होतो. संस्थेच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठरली. यावेळी संस्थेची आर्थिक घडी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रशासकीय कार्यपद्धती अधिक प्रभावी, पारदर्शक व उत्तरदायी बनविणे, सभासदांचा विश्वास अधिक दृढ करणे तसेच संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आगामी काळातील कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संस्थेच्या पुनर्बांधणीला गती देणे, आधुनिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे, उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार संस्थेला सक्षम बनविणे आणि सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासाची नवी दिशा निश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.

प्रसंगी बैठकीला संस्थेचे सर्व सभासद, प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *